
पोलिसांचा धडाकेबाज छापा; तब्बल ५ किलो ५१० ग्रॅम गांजा जप्त, आरोपी तुरुंगात पुसद. शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेलु बु. येथे गांजाची लागवड करून ठेवलेल्या एका वृद्धाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ५ किलो ५१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे २७ हजार ५५५ रुपये इतकी आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वनाथ मारोती शिरडकर (वय ६७, रा. शेलु बु.) याने आपल्या घराच्या पडक्या भिंतीलगत गांजाची लागवड केली होती. पोलिसांनी छापा टाकला असता ८ झाडे, पान, फांद्या व मुळासह गांजा मिळून आला. प्लॅस्टिकच्या पिशवीसह एकूण वजन ५ किलो ६२० ग्रॅम निघाले असून त्यातील पिशवीचे वजन वगळल्यावर शुद्ध गांजा ५ किलो ५१० ग्रॅम आढळून आला. ही कारवाई दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.२० ते संध्याकाळी ६.१० वाजेच्या दरम्यान करण्यात आली.गुन्हा कलम २० (i) NDPS Act अंतर्गत दाखल करून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. सदरची कार्यवाही ही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बीजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील त्यांचे विशेष पथकातिल – पोहावा पंकज पातुरकर, सौरभ लोखंडे, नरेश नरवाडे, इरफान आगवान, पराग गिरणारे, कल्पना रबडे यांच्यासह पुणे, वानखडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार, पोहवा भगत, मनोज कदम, आकाश बाबुळकर यांनी केली. सदर प्रकरणाचा तपास पीएसआय सनगर यांच्या मार्फत सुरू असून जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.