चाकण शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर.

Photo of author

By Sandhya

      कचरा टाकण्यास चाकण नगर परिषदेकडे स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. आंबेठाण रस्त्यावरील खराबवाडी हद्दीतील खाजगी जागेतील दगड खाणीजवळ गेल्या अनेक वर्षापासून चाकण शहराचा कचरा टाकला जात होता. परंतु कचरा टाकण्यास तेथील ग्रामस्थांनी मनाई केल्याने चाकण नगरपरिषद प्रशासन हतबल झाले आहे. चाकण शहरातील रोज जमा होणारा कचरा टाकण्यास चाकण नगरपरिषद कडे स्वतःच्या मालकीची जागा नाही. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने हा कचरा खराबवाडी गावच्या हद्दीतील खाजगी मालकीच्या मोकळ्या जागेत आणि दगडाच्या खाणीत गेल्या अनेक वर्षांपासून टाकला जात होता. चाकण ग्रामपंचायत अस्तित्वात असताना देखील याच दगड खाणीत चाकणचा कचरा बिनदिक्कतपणे टाकला जात होता. प्लॅस्टिक कचरा नष्ट होत नसल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाकण नगर परिषदेकडे कचरा टाकण्यात जागा नसल्याने गेल्या दोन दिवसापासून चाकण मधील कचरा एका जागेवर पडून आहे. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. चाकण शहरात जागोजागी कचऱ्याचे ढग लागल्याने शहराचे विद्रूपीकरण वाढवून बकालपणा दिसू लागला आहे. चाकण बाजारपेठ आणि रस्त्यावर कचऱ्याचे मोठमोठे साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होऊ लागला आहे. 
चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी सांगितले की,” कचरा व्यवस्थापन करण्यासाठी व कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. चाकण शहरात कचरा साचल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.” 
” कचऱ्यामुळे बिरदवडी येथील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. शेत पिके धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासन, स्थानिक अधिकारी पोलीस यंत्रणा कुठलीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे स्थानिक जनतेवर दबाव आणून जनआंदोलन चिरडून टाकण्याचा व कायद्याचा धाक दाखवून आरेरावी करत आहेत. चाकण नगरपरिषदेने त्यासाठी पर्यायी जागा शोधून तिथे अद्यावत प्लांट उभा करावा.” – शैलेश फडके, युवक नेते, बिरदवडी.

Chakan garbage problem,Chakan Municipal Council,Chakan city news,Waste management Chakan,Maharashtra civic issues,Garbage crisis 2025,Urban sanitation India,Health hazards Chakan,Pollution in Chakan,Biradwadi water contamination,Ankush Jadhav Chakan,Shailesh Phadke,PMC waste issues,Chakan environmental problems,Chakan civic news

चाकण कचरा समस्या,चाकण नगरपरिषद,खराबवाडी कचरा,चाकण आरोग्य समस्या,चाकण परिसर बातम्या

Leave a Comment

You cannot copy content of this page