
केडगाव, ता.२२ : दौंड तालुक्यातील चौफुला येथील कला केंद्राच्या परिसरात सोमवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. परंतु ही माहिती दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कला केंद्राजवळ गर्दी असतानाही धाडसपूर्ण घटना घडली,त्यावेळी केंद्रात एक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. गर्दी असतानाही गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली, अशी माहिती आज वाऱ्यासारखी परिसरात पसरली. तसेच ही माहिती प्रसारमाध्यमाना समजली असता, पोलिसांनी चौफुला येथे असलेली तीन कलाकेंद्र यांची कसून तपासणी केली, परंतु अद्याप त्यांच्याकडून अधिकृत माहिती दिली नाही.
यापूर्वीही चौफुला या परिसरामध्ये भव्य दिव्य असलेल्या कला केंद्रात पुण्यातील थाटामाटात येणारे लोक कमरेला अडकवलेला गावठी कट्टा हवेत गोळीबार करूनी दहशत निर्माण केली होती.आपली कला जोपासण्यासाठी येथील कला केंद्र सर्व नियम पाळतात की नाही, कला केंद्राच्या नावाखाली कुठला धंदा चालतो यासाठी या ठिकाणी कुठलेच नियम नाही,परंतु येथे स्थानिक पोलिसांना त्यांचा मलिदा नक्की मिळतो,त्यामुळे येथील स्थानिक नागरिक काल झालेल्या घटनेची चर्चा सध्या करीत आहेत. रात्री झालेली घटना दिवसा उजेडात आली म्हणून पोलिसांनी फक्त हा बनाव केला का? अशी सध्या चर्चा आहे, त्यामुळे येथील असलेले कला केंद्र गुन्हेगाराचे तांडव बनत चालले आहे. याकडे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हे स्वतः लक्ष घालून कारवाई करणार का ते सध्या पाहणे अवचित्याचे ठरले आहे.