
यवत-चौफुला येथे एका कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा राज्यभर पसरली होती . या चर्चेवरती यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी दोन दिवस सखोल तपास करून या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे . वाखारी येथील अंबिका कला केंद्रात दि . २१ जुलै रोजी रात्री साडेदहा ते अकरा च्या सुमारास हा गोळीबार झाला .लावणी कलावंताची लावणी झाल्यानंतर हा गोळीबार झाला या प्रकरणी गणपत जगताप , बाबासाहेब मांडेकर , चंदकांत मांडे आणि अन्य एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत अंबिका कला केंद्र चालकाने वेळेत माहिती पोलिसांना दिली असती तर तात्काळ आरोपींना अटक करता आली असती
सदर माहिती लपवल्याबद्दल अंबिका कला केंद्र चालकावर पोलिसानी गुन्हा का दाखल करू नये ?
अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे