
पुणे दि. 5: ‘महसूल सप्ताह २०२५’ निमित्ताने जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविण्यात आले अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. याअंतर्गत जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास दाखले आदींचे वितरण करण्यात आले.
जुन्नर तालुक्यात निमगाव, राजुर, सावरगाव या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 66 जातीचे दाखले, 86 उत्पन्नाचे दाखले, 22 वय अधिवास दाखला व 16 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. आंबेगांव तालुक्यात 06 मंडल भागात 20 जातीचे दाखले, 126 उत्पन्नाचे दाखले, 9 वय अधिवास दाखला, 18 अल्पभूधारक, 13 ईडब्ल्यूएस, 39 आधारकार्ड, 44 संजय गांधी निराधार योजना, 34 आरटीएस, 12 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व 11 शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या.
मावळ तालुक्यातील मंडल भागात 127 मतदार नवीन नोंदणी, 14 जातीचे दाखले, 203 उत्पन्नाचे दाखले, 32 रहिवासी दाखले, 31 शिधापत्रिका, 46 आधारकार्ड, 23 संजय गांधी निराधार योजना, 54 ऑनलाईन 7/12, 247 फेरफार, 21 आयुष्यमान भारत कार्ड, तसेच लोणावळा येथील व्ही पी एस हायस्कुल येथे अधिवास प्रमाणपत्रासाठी 335 अर्ज भरुन घेण्यात आले.
मुळशी तालुक्यातील मंडल भागात 16 जातीचे दाखले, 317 उत्पन्नाचे दाखले, 97 फेरफार नोंद, 75 शिधापत्रिका, 9 आधार जोडणी , 25 डोमिसाईल, ई सेवा प्रतिज्ञापत्र 155, 580 7/12 उतारे, 6 आयुष्यमान कार्ड, 8 शेतकरी कार्ड, 5 डीबीटी, 7 वारस ठराव निर्गत करण्यात आले.
पिंपरी चिंचवड अपर तहसील अंतर्गत 320 उत्पन्नाचे दाखले, 2 रहिवास दाखले, 14 वय अधिवास दाखले, 77 7/12 उतारे, 184 आधार कार्ड, 10 फेरफार दुरुस्त्या, 163 शिधापत्रिका नवीन/ दुरुस्ती, 25 वारस प्रकरणे, अपर तहसील लोणी काळभोर अंतर्गत 74 उत्पन्न प्रमाणपत्र, 32 वय अधिवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, 10 रहिवास प्रमाणपत्र, 4 जात प्रमाणपत्र, 12 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, 20 संजय गांधी निराधार योजना, 40 शिधापत्रिका वाटप/ दुरुस्तीचे कामकाज करण्यात आले.
हवेली तालुक्यामध्ये 18 जात दाखले, 314 उत्पन्न दाखले, 16 फेरफार निर्गत, 35 शिधापत्रिका, 76 आधार कार्ड जोडणी, 7 डोमिसाईल चौकशी, 298 ई सेवा केंद्र प्रतिज्ञापत्र, 1252 7/12 फेरफार, 14 आयुष्यमान कार्ड, 6 वारस ठराव, पुणे शहर तालुक्यात 80 उत्पन्न दाखले, 30 रहिवास दाखले, 25 नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, 30 आधार कार्ड वितरीत करण्यात आले.
भोर तालुक्यामध्ये 09 ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 47 संजय गांधी योजना, 73 आधार कार्ड, 441 विविध दाखले, 90 ॲग्रीस्टॅक नोंदणी संख्या, 108 शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. वेल्हा ( राजगड) तालुक्यामध्ये 5 मंडळात 77 संजय गांधी योजना, 72 आधार कार्ड, 164 विविध दाखले, 29 ॲग्रीस्टॅक नोंदणी संख्या, 59 शिधापत्रिका वाटप करण्यात आले.
इंदापुर तालुक्यात 12 मंडळात 145 उत्पन्नाचे दाखले, 289 7/12 उतारे, 28 मंजूर फेरफार, 76 शिधापत्रिका, बारामती तालुक्यामध्ये 7/12 उतारे 810, संजय गांधी व श्रावण बाळ योजना 220 प्रकरणे, 348 जातीचे दाखले, 295 डोमिसाईल, 1180 उत्पन्नाचे दाखले, 140 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, 426 शिधापत्रिका, 15 क.जा.प., 833 प्रधानमंत्री आवास योजना 8 अ उतारे, 768 आधार कार्ड तयार करण्यात आले.
दौंड तालुक्यात 36 संजय गांधी व श्रावण बाळ योजना, 211 जातीचा दाखला, 242 डोमीसाईल, 341 उत्पन्नाचे दाखले, 202 नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, 39 आधार कार्ड, पुरंदर तालुक्यात 90 संजय गांधी व श्रावण बाळ योजना, 80 जातीचा दाखला, 29 डोमीसाईल, 242 उत्पन्नाचे दाखले, 28 नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, 93 शिधापत्रिका, 4 क.जा.प., 10 प्रधानमंत्री आवास योजना 8 अ उतारा, 81 आधार कार्ड याप्रमाणे दाखले, प्रमाणपत्रांचे जिल्ह्यात वाटप करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री. डूडी यांना कळविले आहे.
0000