जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून सतत खून होत आहे.यातच काल
रात्री कौटुंबिक वादातून 30 वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.यामुळे जळगाव जिल्हा हादरला
आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश पंडीत भावसार (सोनार, वय ३०, रा. अयोध्या नगर, जळगाव) असे मयत
तरुणाचे नाव आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून आकाशचा पत्नी आणि तीच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद होता. काही दिवसांपासून तो
पत्नीला घेऊन वेगळा राहत होता. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी कौटुंबिक वाद सुरू असायचा. शनिवारी (३ )रात्री ११
वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल ए वन जवळ आकाशला गाहून धारदार शस्त्राने मांडीवर,
छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून त्याला जखमी केले सोबत दोन राऊंड बंदुकीचे फायर केले.आकाश
यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकाने तपासून
त्याला मयत घोषित केले.
दरम्यान, रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ
थारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. ४ संशयीत तरुणांची नावे समोर आली.
असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत