


जेजुरी शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळावे तसेच आंदोलक मनोज जरांडे यांना उत्तम आरोग्य लाभण्या साठी आज शहरातून रॅली काढण्यात आली होती.
रॅली नंतर सर्व समाज बांधवांनी जेजुरी गडावर जावून कुलदैवत खंडोबा देवाला अभिषेक घालून साकडे घातले.
जेजुरी आणि पंच क्रोषितील सकल मराठा समाजाच्या वतीने या रॅली चे व उपक्रमाचे आयोजन केले होते.