
खंडोबा भक्तांना दिले 1000 किलो डाळिंब
अवघ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील गाभाऱ्यात आज डाळिंबाच्या फळाची आकर्षक अशी सजावट करण्यात आलीय…आज वैशाख पौर्णिमेनिमित्त खंडोबा देवाचे गुरव, कोळी, वीर, घडशी आणि पुजारी त्याचबरोबर जेजुरीचे देवस्थान यांच्या माध्यमातून ही आकर्षक अशी डाळिंबाच्या फळांची सजावट करण्यात आलीय…..खंडोबा देवाचे भक्त खंडू नाना जाधव यांचे विशेष सहकार्यातून मुख्य गाभाऱ्यांमध्ये सजावटीसाठी 1 हजार किलो डाळिंब देण्यात आली होती. याच डाळिंबाचा वापर करून गाभाऱ्यात डाळिंबाची आकर्षक सजावट करण्यात आलीय