
जेजुरी शहरात नागपंचमी निमित्त ग्रामदैवत नागेश्वर महाराज मंदिरात जेजुरी शहर नाभिक समाजाच्या वतीने धार्मिक उपक्रम करण्यात आले.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी प्रमाणे नागपंचमी निम्मित ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात जेजुरी शहर नाभिक समाज व ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पूजा अभिषेक,आरती, तसेच मंदिरात सजावट करण्यात आली होती..
यावेळी नाभिक समाजाच्या कार्यकर्त्या बरोबर शहरातील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
या नागपंचमी सोहळ्याचे आयोजन नाभिक समाजाचे पदाधिकारी मल्हार राऊत,जॉनटी राऊत,यशवंत राऊत, सुशील राऊत,महेश गायकवाड,सनी राऊत, प्रसाद क्षीरसागर, परितोष राऊत,श्रीकांत पांडे,सतीश सांगळे आदींनी केले यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राऊत,माजी नगरसेवक दिलीप गायकवाड ,मच्छिंद्र राऊत व समाज बांधव उपस्थित होते.