

जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाच्या “हर घर तिरंगा” ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या निमित्ताने जेजुरी नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये जिजामाता विद्यालय व पुण्य श्लोक अहिल्यादेवी विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी तिरंगा झेंडा घेवून सहभागी झाले होते.
या निमित्ताने जेजुरी नगर परिषदेची इमारत तिरंगा फुग्यानी सजविण्यात आली होती. तसेच हर घर तिरंगा विषयावर रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या अभियानाचे जेजुरी कर नागरिकांनी स्वागत केले.
लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मूळ कल्पना आहे. सदर उपक्रम भारत्ताच्या राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंध निर्माण करण्यावर आधारित आहे. “हर घर तिरंगा” मोहीम लोक चळवळ बनली असून या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र राज्याने लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. सन २०२५ मध्ये सुद्धा सदर मोहीम मोठ्या उत्साहात राबविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. असे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.
या रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले,जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे,पदाधिकारी अलका शिंदे,मंगल पवार,गणेश भोसले,रवींद्र खोमणे,जेजुरी शहर शिवसेनेचे अध्यक्ष विठ्ठल सोनवणे, आदी उपस्थित होते .
या अभियानाचे नियोजन जेजुरी नगरपरिषदेचे आधिकारी बाळासाहेब खोमणे,राजेंद्र गाढवे,बाळासाहेब बगाडे,प्रवीण भोई,प्रमोद भापकर ,तेजस बोरकर,सुनील ताजवे,बाळासाहेब भोसले,नागनाथ बिराजदार,गणेश रणदिवे,अमर रनवरे,अक्षय शिरगीरे,वंदना चीव्हे,मंजुश्री खलाटे,राजश्री बार भाई,युक्ता निरगुडे आदींनी केले.