
जेजुरी वार्ताहर दिनांक जेजुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 8 रोजी जेजुरी नगरपरिषद सभागृहात दहा प्रभागातील 20 जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
जेजुरी नगरपरिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा प्रभाग असून यातून 20 सदस्य निवडले जाणार आहेत तर नगराध्यक्ष जनतेतून निवडून देण्यात येणार आहे.
20 जागांपैकी अनुसूचित जाती साठी दोन महिला एक पुरुष अशा तीन जागा, ओबीसी साठी तीन महिला दोन पुरुष अशा पाच जागा तर सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी सात पुरुष व पाच महिला असे आरक्षण आहे.
नगरपरिषद सभागृहात उपजिल्हाधिकारी सुरेखा माने यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत जाहीर केली.
प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण खुले आरक्षण
प्रभाग क्रमांक 2 साठी नागरिकांचा मागास वर्ग महिला व सर्वसाधारण खुला.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरिकांचा मागास वर्ग महिला व सर्वसाधारण खुला.
प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण खुला,
प्रभाग क्रमांक 6 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण खुला,
प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण खुला,
प्रभाग क्रमांक 8 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण खुला असे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे.
यापूर्वी जेजुरी निवडणूक विभागाकडून प्रभाग प्रारूप रचना जाहीर करण्यात आली होती,याबाबत हरकती मागविण्यात आल्या होत्या . कोणती ही हरकत नागरिकांकडून देण्यात आल्या नाहीत असे यावेळी मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.
या आरक्षण सोडती वेळी विविध राजकीय पक्षांचे तरुण कार्यकर्ते,माजी नगरसेवक तसेच महिला उपस्थित होत्या. आरक्षण जाहीर झाल्या नंतर इच्छुक उमेदवार व नागरिकांच्या उत्साह पाहण्यास मिळाला.
जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुका या राजकीय पक्षाचे वर्चस्व आणि अर्थ पूर्ण होतात हे जग जाहीर आहे.. त्यामुळे सक्षम असणाऱ्या इच्छुकांना संधी प्राप्त होते. अर्थ बळ ना वापरता काम करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळायला हवी अशी भावना सर्वसामान्य मध्ये आहे.