

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण येथे आज सकाळी एक भीषण अपघात घडला. पंढरपूरहून दर्शन घेऊन घरी परत असलेल्या एका दाम्पत्याला अज्ञात टँकरने धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी आहेत.
अपघाताची वेळ आणि ठिकाण:
दि. 06/07/2025 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता सोलापूर-पुणे नॅशनल हायवेवरील भिगवण येथे, रवींद्र सेल्स या दुकानाच्या समोर हा अपघात घडला.
मल्हारी बाजीराव पवार (वय ५७ वर्षे, शेटकरी, येळपणे पोलीस वाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर). यांचा मृत्यू झाला आहे पंखाबाई मल्हारी पवार (वय ५० वर्षे, पत्नी). जखमी आहेत मोटरसायकल (MH 16 AG 2343).
मल्हारी पवार आणि पंखाबाई पवार हे पंढरपूरहून दर्शन घेऊन मोटरसायकलवरून घरी परत असताना एका अज्ञात टँकरने त्यांना मागून धडक दिली. या धडकीत मल्हारी पवार ठिकाणीच मृत्यू पावले, तर पंखाबाई गंभीर जखमी होऊन लाईफ लाईन हॉस्पिटल, भिगवण येथे उपचाराधीन आहेत.
स्थानिक पोलिसांनी टँकरचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून, गुन्हा नोंदवून चौकशी करत आहेत. अपघाताच्या ठिकाणी टँकरचा वेग, ड्रायव्हरची लापरवाही किंवा इतर कारणे याविषयी तपास केला जात आहे. या घटनेमुळे परिवारातील एकमेव कमावते सदस्याचा निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर गंभीर संकट आले आहे. पोलिसांनी टँकर ड्रायव्हरला लवकरात लवकर धरून कायद्याची योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.