विठ्ठल मंदिरात दररोज 3,600 भाविकांना घेता येणार दर्शन
प्रतिनिधी निलेश बनसोडे
पंढरपूर- पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दरोज हजारो भाविक पंढरपुरात येत असतात येणाऱ्या भाविकांना चांगले आणि वेळेत दर्शन मिळावे. यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या टोकन दर्शन सुविधेची सध्या चाचणी सुरु करण्यात आली असून रोज ३ हजार ६०० भाविकांना ऑनलाईन बुकिंग करून प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन घेता येत आहे.
पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्षभर रीघ सुरु असते. प्रामुख्याने आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भाविकांची अधिक गर्दी होत असते. दरम्यान पुढील महिन्यात आषाढी एकादशी असून आता पंढपुरात पायी दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. यामुळे पुढील दोन महिने तरी भाविकांची गर्दी अधिक राहणार आहे. त्या अनुषंगाने भाविकांना चांगले दर्शन घेता यावे; या दृष्टीने टोकन दर्शन सुरु करण्यात आले आहे.

तिरुपती बालाजीच्या धरतीवर पंढरपुरात ही विठ्ठलाचे टोकन दर्शन सुविधा सुरू केली जात आहे. त्यापूर्वी मंदिर समितीने टोकन दर्शन चाचणी सुरू झाली आहे. टोकन दर्शन पद्धतीसाठी सध्या प्रायोगिक तत्वावर दररोज ३ हजार ६०० भाविकांना ऑनलाइन बुकिंग करून कमी वेळेत दर्शनाला सोडण्यात येत आहे. विठ्ठल मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून निशुल्क पद्धतीने टोकन पद्धतीचे ऑनलाईन बुकिंग होते. त्यामुळे भाविकांना आता सहज आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था पंढरपुरात निर्माण झाली आहे.
ऑनलाइन दर्शन पद्धतीमुळे काही काळ सामान्य भाविकांना विलंब होतो. मात्र याबाबतही मंदिर प्रशासनाकडून आता सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. आषाढी पासून नियमीत टोकन दर्शन सुविधा सुरू करण्याचा मंदिर समितीचा मानस आहे. त्या अनुषंगाने मंदिर समितीकडून सुधारणा करून टोकन दर्शन सुरु करण्यात येणार आहे.