
अँकर – दौंड तालुक्यातील पाटस येथे गुरुवार दिनांक 30 ऑक्टबर रोजी डोंगरेश्वर नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या संदर्भात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अरोपी अटक केला असुन, पुढील न्यायालयीन कार्यवाही चालू आहे अशी माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हातील आरोपी हा जिम चालवित असून, आपले कसलेले, पिळदार शरीर दाखवून अनेक महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यात पटाईत आहे. अनेकांचे या आरोपीने संसार उध्वस्त केले आहे. समाजात आपल्या घरचे जर उघड्यावर आले तर या कारणाने दबून बसलेले, अत्याचार झालेले वंचित यांना कोण न्याय देणार? अशी चर्चा सध्या परिसरात रंगत आहे. यवत येथे झालेल्या दंगलीच्या घटनेने पोलीस प्रशासन आधीच सावध झाल्याने यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांनी प्रेस कॉन्फ्रेस घेऊन सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याचे आव्हान करत सर्वांनी याची कळजी घेणे गरजेचे आहे.