

दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हॉटेल निसर्ग व मळद येथील जोगेश्वरी हॉटेल यावरती दि. 9 ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता जबरी चोरी करण्यात आली आहे.
हॉटेल निर्सग येथील सुमारे 95 हजाराची वस्तू सहीत रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. तसेच दौंड शहरांमध्ये हॉटेल कल्पलता व इतर दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. सुमारे सात दिवस उलटून गेले तरी,पोलिस प्रशासनाला तपास लागत नाही, यामुळे दौंड तालुक्यातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे.
अशा चोऱ्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लवकरात लवकर चोरीचा तपास करण्यात यावा व चोरीतील आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे.