दौंड येथील हॉटेलमध्ये गॅसचा भीषण स्फोट; १२ जण जखमी

Photo of author

By Sandhya

दौंड तालुक्यातील पाटस-दौंड रस्त्यावरील जगदंबा हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.

ही घटना बुधवारी दुपारी घडली. हॉटेलच्या स्वयंपाकघरात गॅस गळती झाल्याचे लक्षात न येता आगीत स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे हॉटेलचे संपूर्ण छत उडाले होते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते, स्फोटाचा नेमके कारण व अन्य बाबींचा तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. हॉटेल्समध्ये सर्यास घरगुती गॅस वापरले जात आहे. व्यावसायिक गॅस वापरणे बंधनकारक आहे. परंतु सर्व नियमाना हरताळ देत हे ग्राहकांच्या जीविताशी खेळत आहे. प्रशासनाच्या वतीने अशा हॉटेल्सवरती कारवाई होणे गरजेचे अशी मागणी सध्या नागरिक करीत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page