



मंचर :धामणी ( तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरामध्ये शनिवारी (९ आँगस्ट २५) श्रावण पौर्णिमा व राखी पौर्णिमा व शुक्ल यजु: हिरण्यकेशी तैत्तिरीय श्रावणी हयग्रीवोत्पत्ती,अगस्ती दर्शन निमित्ताने पारंपारिक बिल्व (बेल) बेलफळ.फूल अर्पण सोहळा उत्सव साजरा करण्यात आला. फुलांची आकर्षक सजावट, सप्तशिवलिंगाला केलेला सुवासिक अत्तर व केशरमिश्रीत भंडार्याचा लेप व सजवलेली खंडोबा.म्हाळसाई.बाणाईची लोभस मूर्ती पाहून भाविक सुखावल्याचे पाहायला मिळाले.पहाटे सुवासिक फुलांनी सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेला सुवासिक भंडार्याचा लेप स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा.म्हाळसाई.व बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय सर्वांगसुंदर मूर्ती.मोगर्याच्या सुंगधाने दरवळून गेलेला धामणीच्या कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिर परिसर.कपाळभर भंडारा लावून “सदानंदाचा येळकोटचा” जयघोष करणारे भाविक आणि आबालवृध्द महिलाचा लक्षणीय सहभाग हे सारे भक्तिमय वातावरण श्रावण पौर्णिमेला बिल्व (बेल) फुल व फळ पूजा सोहळ्याच्या निमित्ताने धामणी (तालुका आंबेगांव)येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात शनिवारी (दिंनाक ९ आँगस्ट) भल्या पहाटेला दिसून आले . श्रावण महिण्यातील अधूनमधून येणार्या रिमझिम पाऊसाच्या वातावरणात पूर्वापार चालत असलेल्या प्रथा आणि परंपराचे पालन करत धामणी येथील खंडोबा देवस्थान मंदिरात श्रावण पौर्णिमेच्या शनवारच्या दिवशी पहाटे (९ आँगस्ट २५ ) पांच वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली सुक्रे व सौ सुनंदा सुक्रे,भाजपाचे आंबेगांव तालुक्याचे अध्यक्ष किरण वाळूंज व सौ सारिका वाळूंज.(खडकवाडी लोणी) ,रानमळ्याचे सरपंच राजेंद्र सिनलकर व सौ माधुरी सिनलकर,आणि अभिषेक सिनलकर व सौ पूजा सिनलकर (रानमळा लोणी),भाऊसाहेब कदम व सौ सुवर्णा कदम.आणि राजेंद्र गणपतआण्णा जाधव व सौ जयश्री जाधव .व ज्ञानेश्वर मैड व सौ जयश्री मैड (धामणी).शिरुरचे उद्योजक अशोकराव नाना कांदळकर व सौ उषा कांदळकर ( कवठे यमाई.शिरुर) गावडेवाडीचे माजी सरपंच संतोष ज्ञानेश्वर गावडे व सौ शोभा गावडे (गावडेवाडी .आंबेगांव),बबनराव वीर व सौ आशा वीर (पहाडदरा ) या नऊ जोडप्याच्या हस्ते सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक त्यानंतर पंचामृताने रुद्राभिषेक करून बेल. पुष्प व फळपूजा उत्सवाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर महाआरती झाल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.प्रभाकर भगत.शांताराम भगत.पांडुरंग भगत.नामदेव भगत.राहूल भगत.राजेश भगत.बाळशिराम साळगट.अनिरुध्द वाळुंज.प्रमोद देखणे यांनी सप्तशिवलिंगावर बिल्व (बेल) व फुल पूजा घालण्यास सुरुवात केली. मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात मोगर्याचे हार तसेच झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली दिसून आली सप्तशिवलिंगाची षोडशोपचार पूजा करुन झाल्यानंतर उपस्थित भाविक सेवेकरी ग्रामस्थाच्या कपाळाला भंडार्याचा मळवट लावण्यात आला त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. बिल्व(बेल) अभिषेक पूजेचे मानकरी नऊ जोडप्यांचा सेवेकरी मंडळीनी श्रीफळ व भंडारा देऊन सत्कार केला. भंडारा उटी फुल व फळ पुजेमुळे देवस्थान व परिसरातील वातावरण आपोआप आध्यात्मिक उर्जेने ढवळून निघाल्याचे दिसून आले.श्रावण महिण्यातील राखी पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी महाळूंगे पडवळ.गावडेवाडी.अवसरी.खुर्द लोणी.खडकवाडी.संविदणे.कवठे पाबळ तळेगांव ढमढेरे येथील भाविक आलेले होते.