धामणीत सप्तशिवलिंगावर हरिद्रागंध उटी व १०१ डझन आंबा फळाची आरास !

Photo of author

By Sandhya

मंचर धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात हरिद्रागंध उटीने व १०१ डझन आंबा फळाने सजविलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेले सुवासिक अत्तर व केशरमिश्रीत हरिद्रागंधाचा लेप.स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय मूर्ती तसेच मंदिर परिसर फुलांच्या सुंगधाने दरवळून गेलेला होता धामणीच्या खंडोबा मंदिरात हरिद्रागंध उटीचा सोहळा मोठ्या पारंपारिक वाद्याच्या गजरात व भक्तिमय भजनात उत्साहात सरत्या वैशाख अमावस्येला व जेष्ठ मासारंभला (मंगळवारी) पहाटे पार पडला नऊ जोडप्याच्या हस्ते अभिषेक वसंतपूजा आरती करण्यात आली वैशाख अमावस्येच्या दिवशी नगर.नाशिक व पुणे जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती.

Leave a Comment

You cannot copy content of this page