
नववर्षानिमित्त लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत सुरक्षिततेच्यादृष्टीने पर्यटनस्थळ परिसरात 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.
पुणे मुंबई, कामशेतकडे येणाऱ्या वाहने पवनानगर बाजारपेठेत बंदी घालण्यात येत असून येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे) कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुणे,मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली फाटा मार्गे जवन रोडवरुन फांगणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग अशी वाहतूक वळविण्यात येत आहे. परंतु, पवना नगर, कालेगाव, आंबेगाव, शिदगाव, पाले, धामनधरा, दुधीवरे बाजुस जाणारी वाहने तसेच जड,अवजड वाहने सोडण्यात येतील.
येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे)-कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुर्णे,मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली एकेरी वाहतुक करण्यात येत आहे. मौजे ब्राम्हणोली, वारु, कोथुर्णे, शिवली येथील स्थानिक रहिवाशांना येळसे बाजुकडे येण्यास बंदी करण्यात आली असून, वारु फाटा-ब्राम्हणोली फाटा-पवना नदी पुल-कालेगाव फाटा-पवना बाजारपेठ मार्गे येळसे कामशेत असे जाता येईल. पवनानगर बाजारातपेठेत वाहतूक कोंडी होवू नये म्हणून जड,अवजड वाहनांना जाण्यास बंदी करण्यात येत आहे.
1 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुंग, मोरवे, चवसर, जवन, खडक गेव्हडे, ठाकुरसाई, फांगणेकडून पवनानगर, कामशेतकडे जाणारी वाहने काले कॉलनी पवनानगरकडे जाण्यास मनाई करण्यात आली असून ब्राम्हणोली फाटा उजवीकडे-वारु फाटा सरळ-मळवंडी,कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे-कोथुर्णे गाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून डावीकडे येळसेबाजुकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा मार्गे मुंबई पुणे, कामशेत कडे वळविण्यात येत आहे. परंतु, पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, दुधीवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड, अवजड वाहनांना सोडण्यात येईल.
ब्राम्हणोलीफाटा उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजुकडे) येळसे प्रामपंचायत फाटा अशी एकेरी वाहतूक करण्यात येत आहे. वारु ब्राम्हणोली येथील स्थानिक रहिवाश्यांनी पवना नदी पूल-कालेफाटा-पवना बाजारपेठेत येण्यास बंदी करण्यात येत असून, वारु फाटा-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ अशी या पर्यायी मार्गे वळविण्यात येत आहे, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असेही आदेश जारी केले आहे.