नांदेडसिटी पोलिसांची तडाखेबंद कारवाई – गाडी घासल्याच्या वादातून हवेत गोळीबार करणाऱ्या सहा जणांना अटक

Photo of author

By Sandhya

पुणे – गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून कोल्हेवाडी परिसरात दि. ४ ऑगस्ट रोजी काही युवकांनी थेट हवेत तीन गोळ्या झाडून दहशत माजवली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र नांदेडसिटी पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत सहाही आरोपींना खडकवासला परिसरातून ताब्यात घेतले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हा घडल्यानंतर त्यांनी तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले. तपासदरम्यान पोलीस अंमलदार स्वप्नील मगर, बंटी मोरे आणि संग्राम शिनगारे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संबंधित आरोपी खडकवासला चौपाटी परिसरात थांबले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव व त्यांच्या पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेत संशयित सहा युवकांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गु.रजि. क्रमांक १५९/२०२५ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), ३५१(२)(३), ३५२, तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ३, २५, २७, गुन्हेगारी दुरुस्ती कायदा कलम ७ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे –

  1. साहिल अरविंद चव्हाण (२४), रा. सप्तगिरी हाइट्स, खडकवासला
  2. अभिजीत राजू चव्हाण (३१), रा. तिरुमल हाइट्स, कोल्हेवाडी
  3. प्रशांत यशवंत चव्हाण (३४), रा. सप्तगिरी हाइट्स, लमाणवाडी, खडकवासला
  4. आकाश भीमा चव्हाण (२४), रा. तिरुमल हाइट्स, खडकवासला
  5. गितेश शंकर जाधव (२०), रा. नानाजी व्हिलाच्या मागे, खडकवासला
  6. मंदार यशवंत चव्हाण (३९), रा. सप्तगिरी हाइट्स, लमाणवाडी, खडकवासला

या संपूर्ण कारवाईमध्ये मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिक्षेत्र ३ श्री. संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कारवाईतील पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, प्रविण जाधव, पो. उपनिरीक्षक कसबे, तसेच पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, राजू वेगरे, प्रतीक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, अक्षय जाधव, सतीश खोत, निलेश खांबे यांचा समावेश होता.

या वेळी नांदेडसिटी पोलिसांनी दाखवलेली तत्परता व शौर्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून परिसरातील नागरिकांतून या कारवाईचे कौतुक होत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page