
पुणे ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैधरीत्या चालू असलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहीम चालू करून सदरचे अमली पदार्थ विकणाऱ्यांवर तसेच जवळ बाळगणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना दिले होते. सदर सूचनांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर , यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, जगदेव पाटील, पोलीस शिपाई सत्यम केळकर, सुभाष थोरात, गोरक्ष केंद्रे, पोलीस पाटील जाधव, महिला पोलीस शिपाई शितल गारगोटे , पोलीस हवालदार संतोष कोकणे , वनपरिक्षेत्राधिकारी श्री प्रदीप चव्हाण, शासकीय पंच यांचे पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 16 मे 2025 रोजी संशयित आकाश मारुती शिंदे (वय 25 वर्ष रा. हिवरे तर्फे नारायणगाव ता.जुन्नर, जि. पुणे सध्या रा.नारायणगाव, ता.जुन्नर जि.पुणे )यास वारूळवाडी गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवेच्या मांजरवाडी पुलाखाली रंगेहात पकडले असून त्याच्याकडून 4.8 किलोग्रॅम वजनाचा गांजा, एक केसरी रंगाचा 40 किलो वजन क्षमतेचा वजनकाटा,एक काळ्या रंगाची स्कॉडा कंपनीची फॅबीया या मॉडेलची चारचाकी गाडी (गाडी नं.एम. एच. 04, ई. टी. 4626)असा एकूण 5,49,000/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीविरुद्ध फिर्यादी सत्यम अशोक केळकर पोलीस शिपाई , नारायणगांव पोलीस स्टेशन, यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम,1985 कलम 8(c),20(b)(ii)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री पंकज देशमुख, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, जगदेव पाटील, पोलीस शिपाई सत्यम केळकर, सुभाष थोरात, गोरक्ष केंद्रे, पोलीस पाटील जाधव, महिला पोलीस शिपाई शितल गारगोटे , पोलीस हवालदार संतोष कोकणे, वनपरिक्षेत्राधिकारी श्री प्रदीप चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे व पोलीस शिपाई अक्षय नवले यांच्या पथकाने केली आहे.