

मराठा तरुणांनी केली वसनाबाजी
पोलिसांनी तरुणांना घेतले ताब्यात
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.
लक्ष्मण हाके हे निरा येथे आले असता एका हॉटेलमध्ये ते थांबले होते.. याबाबतची माहिती तरुणांना मिळतातच हॉटेलच्या बाहेर येऊन तरुणांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत या तरुणांना ताब्यात घेतलं… मनोज जरांगे यांच मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.. त्या पार्श्वभूमीवर मराठा तरुण संतप्त आहेत.. राज्य सरकारकडून जरांगेच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही त्यातच लक्ष्मण हाके हे मराठा आंदोलकांच्या विरोधात बोलत आहेत. यातूनच हाके यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली…