नीरा डाव्या कालव्यात अनोळखी मृतदेह.

Photo of author

By Sandhya


नीरा नजीक पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील नीरा डाव्या कालव्यामध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार शनिवारी (दि. २५) सकाळी उघडकीस आला. याविषयी पिंपरे खुर्द येथील किरण शिंदे यांनी पोलिस पाटील रुपाली सोनवणे यांना पालखी महामार्गाच्या पुलाजवळील कालव्यात मृतदेह पाण्यात तरंगताना दिसल्याची माहिती दिली.

दरम्यान, सोनवणे यांनी घटनास्थळी पाहणी केली असता कमरे इतक्या पाण्यात मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ नीरा पोलिस ठाण्याला कळवले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने व पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे असून अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, शेडो बनियन, निळसर रंगाची पँट, कमरेला निळा पट्टा असून डोक्यावर टक्कल असल्याचे आढळले. मृतदेहावर जलचर प्राण्यांनी कुरतडल्याच्या खुणा आढळल्या आहेत. प्राथमिक तपासानुसार, मृत्यूला दोन ते तीन दिवस उलटल्याचे समजते. हा मृतदेह जेजुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page