
दौंड तालुक्यातील केडगाव येथे दिनांक 28 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात उमेदवार चाचपणी, परिचय या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांचे सुपुत्र बोरीपारधी-केडगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण जाहीर झाल्याने, तुषार थोरात यांची जोरदार चर्चा चालू आहे. याच पार्श्वभूमीवरती काल झालेल्या बैठकीमध्ये तुषार थोरात यांचे एकच नाव आले आहे. जवळपास केडगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे तुषार यांचे नाव जाहीर झाले आहे.
रमेश थोरात म्हणाले, दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण विभागवाईज बैठका पूर्ण झाल्या असून, लवकरच भव्य-दिव्य असा जाहीर मेळावा घेऊन पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर केले जाणार आहे.
वैशाली नागवडे म्हणाल्या की, राहू-खामगाव गटात अनेक गुऱ्हाळघरे असून, यामध्ये अनेक दिवसापासून परप्रांतीय मजूर वास्तव्यास आहेत. आपण जर मतदार यादी हाताळून पहिली तर यामध्ये परप्रांतीय मतदारांचा वाढलेला टक्का नक्कीच आपले डोकेदुखी ठरणार आहे.