पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर – निवडणूक आयोगाचा निर्णय

Photo of author

By Sandhya


मुंबई, दि. २५ : भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे जागा रिकामी झाल्या आहेत.
 
गुजरात : (१) कडी (अनुसूचित जाती): श्री. कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे (२) विसावदर: श्री. भायाणी भूपेंद्रभाई गांधीभाई यांच्या राजीनाम्यामुळे; केरळ : (३) निलांबूर: श्री. पी. व्ही. अनवर यांच्या राजीनाम्यामुळे; पंजाब: (४) लुधियाना वेस्ट: श्री. गुरप्रीत बसी गोगी यांच्या निधनामुळे आणि पश्चिम बंगाल: (५) कालिगंज: श्री. नासिरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:
अधिसूचना जारी होण्याची तारीख २६ मे २०२५; नामनिर्देशन करण्याची अंतिम तारीख २ जून २०२५; नामनिर्देशन छाननी ३ जून २०२५; उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जून २०२५; मतदान १९ जून २०२५ आणि मतमोजणी २३ जून २०२५ रोजी होऊन निवडणूक पूर्ण होण्याची अंतिम तारीख २५ जून २०२५ अशी आहे.
सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहेत. मतदार ओळखीकरिता EPIC व्यतिरिक्त आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, इत्यादी १२ पर्यायी ओळखपत्रे मान्य असतील. आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी त्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page