
पुणे-पंढरपूर पालखी मार्गाचे विस्तारीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे.माञ,पालखी मार्गावरील अपघाताची मालिका सुरूच आहे. पिसुर्टी फाट्यानजिक येथील बाह्यवळणावर कोणतेही दिशादर्शक फलक अथवा राञीच्या वेळेस दिसणारा कोणत्याही सिग्नलची यंञणा कार्यान्वित नसताना,पालखी महामार्गाच्या मधोमध ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लॉक्सला खाजगी प्रवाशी बस धडकल्याने अपघात झाला.
पालखी महामार्गावरील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील सदोष कामामुळे सोमवारी (दि. २७) मध्यरात्री पिसुर्टी (ता.पुरंदर) येथे अपघात झाला. वाल्ह्याहून निरेकडे जाणारी प्रवासी बस रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या सिमेंटच्या दुभाजकाला धडकली.यात बसचे मोठे नुकसान झाले.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघडकीस आल्या आहेत. यामुळे ठेकेदाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.पिसुर्टीतील चौकात दिशादर्शक फलक, विजेची व्यवस्था व सिमेंट ब्लॉक बाजूला केले नाहीत तर पुन्हा अपघात होणार आहे. वाल्हे ते पिसुर्टी या दरम्यान चालू असलेल्या रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी सदोष कामे झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. महामार्गावर दिशादर्शक फलक, वेग मर्यादा सूचक चिन्हे वा रात्रीच्या प्रकाशाची व्यवस्था अद्यापपर्यंत केली नाही. यातच रस्त्याच्या मध्यभागी ठेवलेल्या सिमेंटच्या दुभाजकांचा अंदाज राञीच्या अंधारात येत नसल्याने, या परिसरात वारंवार अपघात होत आहेत.
जेजुरी ते पिसुर्टी फाटा या पालखी महामार्गाचे रूंदीकरणासाठीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, पिसुर्टी फाटा येथून, अद्यापपर्यंत नवीन पालखी महामार्गाचा रस्ता सुरू करण्यात आला नाही. यामुळे सर्व वाहने जेजुरी ते पिसुर्टी फाटा येथपर्यंत वेगात येत आहेत.यातच,पिसुर्टी फाटा येथील बाह्यवळणावरील पालखी महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न करता,सिमेंट ब्लॉक ठेवल्याने,वारंवार अपघात घडत आहेत.
संबंधित ठेकेदार कंपनीने योग्य ते सूचना फलक आणि रात्रीच्या प्रकाशव्यवस्थेची तातडीने व्यवस्था करावी.तसेच सिमेंटचे ब्लॉक्स रस्त्याच्या मध्यभागी कोणतीही चिन्हे न देता ठेवले असल्याने चालकांचा अंदाज चुकतो आणि अपघात होतात. संबंधित ठेकेदार कंपनीने तातडीने फलक, रिफ्लेक्टर आणि योग्य प्रकाशव्यवस्था करणे गरजेचे आहे.अपघाताची ठेकेदार कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही दखल मंगळवारी दुपारपर्यंत घेतलेली नसल्याची माहिती पिसुर्टी येथील सरपंच सारीका प्रदीप बरकडे यांनी दिली.