पालिकेच्या आरक्षित जागेवरच बिल्डरचा डोळा?

Photo of author

By Sandhya

बांधकाम व्यावसायिकास आशीर्वाद कोणाचा?

आरक्षित जागेवर बिल्डरचा अनधिकृतपणे कब्जा?
पुणेसोमनाथ साळुंके सध्या पुणे शहरात मुंढवा येथील गायरान जमीन घोटाळा राज्यभर चर्चेत आला असताना त्यालगतच असलेल्या वडगाव शेरी भागातील पालिकेच्या आरक्षित जागेवरच एका नामांकित बिल्डरने कब्जा केल्याने संबंधित बिल्डरला आशीर्वाद कोणाचा? हा मुख्य प्रश्न अनेकांना सतावत असून यासंदर्भात सदर बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक भोसले यांनी निवेदनाव्दारे पालिका उपायुक्ताकडे केली आहे. सध्या शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर मुंढवा येथे झालेल्या गायरान जमीन घोटाळ्याने खळबळ माजली असतानाच मुंढवा परिसरालगत वडगाव शेरी भागातील पालिकेच्या आरक्षित जागेवरच नामांकित बांधकाम व्यावसायिकाने कब्जा केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात येऊन हा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. वडगाव शेरी परिसरात उच्चभ्रू म्हणून पाहिल्या जाणाऱ्या एका सोसायटी भागात पालिकेची पुणे पेठ सर्व्हे नंबर ९/१,५/१/३(पा.),८/२/१०,८/२/२१, प्लॉट क्रमांक ५बी,सी,डी या ठिकाणी क्षेत्रmh३५चे क्षेत्र असे एकूण ४१८२.००चौरस मीटर ही पालिकेची आरक्षित जागा असून या जागेलगतच गेल्या अनेक महिन्यापासून एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचे नवीन इमारत उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरू असताना संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पालिका अधिकाऱ्यास शक्यतो काही प्रमाणात अर्थपूर्ण चर्चा करून आरक्षित जागेच्या प्रवेशव्दाराचा टाळा तोडून अनधिकृतपणे जागेवर कब्जा करून इमारतीला लागणारे साहित्य संबंधित जागेत टाकून काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे असलेली आरक्षित जागा ही कोणाच्या लक्षात येणार नसल्याने अशा ठिकाणी सुरू असले तरी पण भोसले या सामाजिक कार्यकर्त्याने हा गैरकारभार उजेडात आणल्याने पालिका अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून झोपी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना जाग केव्हा? येणार असा संतप्त सवाल वडगाव शेरी कराकडून करण्यात येत आहे. विशेष करून पालिकेच्या आरक्षित जागेत बांधकाम व्यावसायिकाने पत्रे,लोखंड, मुरुम आदी साहित्य जरी दिसून येत असले तरी पण या जागेचा पालिकेशी पत्रव्यवहार करून ताबा घेतला आहे की,कोण्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यावर बेकायदेशीरपणे कब्जा मिळवला आहे.याचे मात्र उत्तर जरी गुलदस्त्यात राहिले असले तरी पण पालिकेच्या अनेक आरक्षित जागेवर अशा प्रकारे बडे व्यावसायिक कब्जा करून ताबा मिळवत असल्याने अनेक शासकीय जमिनी ह्या बड्या नेत्यांच्या व बांधकाम व्यावसायिकांच्या घशात जाऊन नष्ट होऊ लागल्या आहेत.यामुळे भविष्यात पालिकेच्या आरक्षित जागा शिल्लक राहणार की,नाहीत हा मोठा प्रश्न अनेकांना सतावत आहे.याबरोबरच पंधरा ते वीस दिवसापूर्वीच एका राजकीय नेत्याच्या चिरंजीवनेच गायरान जमिनीवर कब्जा केल्याचे उघड झाल्याने हा जमीन घोटाळा चव्हाट्यावर आला असताना आता शहरातील हा जमीन घोटाळ्याचा दुसरा प्रकार उजेडात आल्याने परिसरात खळबळ माजली असून पालिकेच्या आरक्षित जागेवर कब्जा करणाऱ्या बिल्डरवर पालिका अधिकारी कारवाईची काय?भूमिका घेणार हे देखील निर्णायक ठरणार असून यामध्ये एखाद्या पालिका अधिकारी झालेल्या जमीन घोटाळ्यात सहभागी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबरोबरच संबंधित बांधकाम व्यावसायिकाने कोणत्या राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे या जागेवर कब्जा केला आहे. याबाबत ही शंका उपस्थित होऊन आरक्षित असलेल्या जागेवर पालिकेच्या वतीने नामफलक देखील लावण्यात आला असताना देखील बिल्डरचे एवढे आरक्षित जागेवर कब्जा मिळविणे शक्यच नसल्याचे सिद्ध होत आहे.विशेष करून पालिका अधिकाऱ्यांना या भागात पालिकेची आरक्षित जागा ही वडगाव शेरी परिसरात कोणत्या ठिकाणी आहे याची माहितीच नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येऊन याबाबत पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने जागेसंदर्भात दैनिक हॅलो प्रभात प्रतिनिधीकडेच जागेच्या फोटोंची व अर्जाची मागणी केल्यामुळे अधिकाऱ्याच्या या कामकाजाबाबत शंका उपस्थित होत आहे. यामुळे पालिकेच्या आरक्षित जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करणाऱ्या व त्यास साथ देणाऱ्या दोषी अधिकारी अथवा राजकीय नेत्यावर कारवाई करण्याची मागणी भोसले यांनी करून यावर पालिकेच्या वतीने योग्य पाऊल न उचलल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून यासंदर्भात परिमंडळ१चे पालिकेचे उपआयुक्त माधव जगताप यांच्याशी या संदर्भात प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली असता हे काम आमच्याकडे नसून मालमत्ता विभागाकडे हे काम येत असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करून हात वर केले.तर मालमत्ता विभागाचे प्रशांत ठोंबरे यांच्याशी अनेकदा फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनी प्रतिनिधींचा फोन उचलण्यास टाळाटाळ केली असून यापूर्वीच भोसले यांनी पालिकेचे उपआयुक्त जगताप यांच्याकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली असताना यास दोन ते तीन दिवस उलटून देखील बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करून मालमत्ता विभागाचे अधिकारी धनाजी घागरे यांनी चक्क दैनिक हॅलो प्रभातच्या प्रतिनिधीकडे फोटो व कागदपत्रांची मागणी केल्याने त्यांनी विचारलेल्या या प्रश्नाबाबत वडगाव शेरी परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.तर संबंधित बिल्डरचा नंबर नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.तरी दीपक भोसले यांनी कारवाई लवकर करण्याची मागणी केली आहे._

Leave a Comment

You cannot copy content of this page