पालिकेच्या विरोधात आमदार पठारेंचा एल्गार मोर्चा,दशक्रिया विधी व मुंडण करून पालिकेचा निषेध,पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे धडक मोर्चा

Photo of author

By Sandhya


पुणे(दै. संध्या)पालिका अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे वडगाव शेरी मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने अधिकाऱ्याकडे तक्रार देऊन ही ते कामाची दखल घेत नसल्याने पालिकेच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ मतदार संघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला होता.याविरोधात दशक्रिया विधी कार्यक्रम करून कार्यकर्त्यांनी अर्धे मुंडण करून निषेध व्यक्त केला.
संबंधित आंदोलनात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने सहभाग घेतला होता. यावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे,भैय्यासाहेब जाधव,संतोष भरणे,मनोज सिंग,अमित सावळे,सुभाष कोठावळे,राजपाल भरगुजे,निलेश विरोळे,केतन उमाप,अशोक इटकर, प्रीतम खांदवे,दिनकर मोहिते, विल्सन चंदवेळ, किशोर वीटकर, नाना नलावडे, हानीफ शेख, रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे,संतोष आरडे, कमल जगदने,निलेश जठार, किरण जठार, रवींद्र पठारे, रमेश भालेराव, शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव, राजेंद्र खांदवे, सचिन भगत,जालिंदर कांबळे, मीना सातव, राकेश चौरे, महादेव पठारे,डॅनियल लांडगे,निलेश जठार, किरण जठार,,नाना आबनावे,हर्षद जाधव, सचिन भोसले आदींनी सहभाग घेतला होता.
गेल्या चार ते पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका रखडल्यामुळे सध्या पालिका निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी यापूर्वीचा सर्व कारभार पालिका प्रशासनाच्या हातात असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वडगाव शेरी मतदार संघात पिण्याच्या पाण्यासह रस्ते,पथदिवे,ड्रेनेज लाईन,नगर रोड मार्गावरील होणारी वाहतूक कोंडी,येरवडा,धानोरी,कळस,लोहगाव,वाघोली आदी भागात पावसाळ्यात होणारा पूरपरिस्थितीचा आदी समस्या सर्वसामान्य जनतेला भेडसावत होत्या.यासंदर्भात नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासन अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रारी करून देखील अधिकारी हे जनतेच्या समस्यांकडे पाठ फिरवत केराची टोपली दाखवत असल्यामुळे पालिका प्रशासनाच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नाराजी पसरल्याने मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सुटण्यास अडचणी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने त्या पूर्ण होण्याच्या उद्देशाने पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
पठारेकडून हल्ल्याचा निषेधमागील आठवड्यात मतदार संघातील लोहगाव परिसरात विकासकामांच्या संदर्भात भेट व पाहणी करण्यास गेले असताना विरोधकांनी पठारे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता.याबाबत त्यांना विचारणा केल्यावर विरोधकांनी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला असून पोलिस प्रशासनाच्या वतीने अशा हल्लेखोरावर गुन्हे दाखल केले असून पोलिस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास असून हल्लेखोरावर ते योग्य ती कारवाई करतील.याचबरोबर२००९साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी विरोधकावर गोळीबार केल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला होता.पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले होते.त्यावेळेस स्वतः तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.पाटील यांनी लक्ष घालून प्रकरण हाताळल्यावर त्या झालेल्या घटनेत काही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले होते. तर माझ्या काळात मतदार संघासाठी हजार बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन ही मतदार संघाच्या विकासकामांना चालना मिळत होती.पण सध्या बारा ते पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी पालिका प्रशासनाकडून मंजूर होऊन देखील जर मतदार संघात जनतेचे प्रश्न सोडवण्यास अधिकारी प्राधान्य देत नसतील तर ही पालिकेची मोठी घोडचूक आहे. जनतेचे माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळेच जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम असून मतदार संघात राजकारणाला महत्व न देता समाजकारणाच्या माध्यमातून जनतेचे समस्या सोडवण्यास मी प्राधान्य देत आहे. याबरोबरच रिंगरोडसाठी पालिका प्रशासनास आपले सहकार्य असून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रामवाडी ते रांजणगाव गणपती ह्या रस्त्याचे लवकरच काम हाती घेण्यात येणार असल्याचे पठारे यांनी सांगितले. दशक्रिया विधी व अर्धे मुंडण करून पालिकेचा निषेधपालिकेचे मतदार संघातील मुख्य समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पालिकेच्या गेट बाहेर दशक्रिया विधी कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पालिकेचा निषेध म्हणून माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, संजय देशमुख व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पालिकेच्या विरोधात अर्धे मुंडण करून निषेध करण्यात आला. यादरम्यान कार्यकर्त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
पालिका आयुक्त व आमदार पठारेंची भेट_ मोर्चाची गंभीर दखल घेत पालिकेचे आयुक्त राम किशोर नवल यांनी आमदार बापूसाहेब पठारे यांना भेटीस बोलून सविस्तर चर्चा केली.व पुढील आठवड्यात आपण मतदार संघात दौरा करून तात्काळ विकासकामे करण्याचे आश्वासन आयुक्तांकडून मिळाल्यावरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी आयुक्तांनी कामे करण्याचे आश्वासन दिल्यावरच जाधव,देशमुख यांनी पूर्ण मुंडण केले.मतदार संघातील विविध अपूर्ण असलेली कामे पूर्ण व्हावीत या उद्देशाने पठारे यांच्या वतीने पालिका आयुक्त राम किशोर नवल यांना निवेदन देण्यात आले._
फोटो ओळ
१)आंदोलनात सहभागी झालेले आमदार बापूसाहेब पठारे,२)पत्रकारांशी बातचीत करताना बापूसाहेब पठारे,३)पालिकेच्या विरोधात दशक्रिया विधी व मुंडण करत असलेले कार्यकर्ते

Leave a Comment

You cannot copy content of this page