पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेनिमित्त रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या

Photo of author

By Sandhya


कामाकरिता वाहतूक बंद व पर्यायी मार्गाची व्यवस्थेबाबत आदेश जारी

नाझरे सुपे (प्रतिनिधी):-

पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा 2026 निमित्त रस्त्यांच्या कामांकरिता मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 115 मधील तरतुदी तसेच शासन गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या अधिसूचनेन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी जितेंद्र यांनी खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

कोंढवा (खडी मशीन चौक) – सासवड – वीर रस्ता राज्य मार्ग क्र. 131 किमी 1/600 ते 6/550 या दरम्यान (स्टेज–2: येवलेवाडी कमान ते बापदेव माची) मजबुतीकरण व डांबरीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.
या कालावधीत सासवड ते कोंढवाकडे जाण्याकरीता पालखी मार्ग फुरसुंगी सासवड दिवे घाट या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

तसेच 7 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीत पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा 2026 निमित्त हवेली भागातील डांबरीकरणाचे काम पूर्ण रुंदीच्या पेवर (Full Width Pave ) ने करण्यासाठी काही काळ वाहतुक बंद करुन वरील पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

तरी नागरिक व वाहनचालकांनी वाहतूक बदलाची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page