
५० देशांचे सायकलपटू सहभागी होणार
पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले की ‘पुणे चॅलेंज ब्रँड टूर 2026’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत ४० ते ५० देशांतील सायकलपटू सहभागी होतील.
ही स्पर्धा चार स्टेजमध्ये होणार असून, जानेवारी महिन्यात शनिवार ते मंगळवार या काळात पार पडणार आहे. अंतिम तारखा ठरवण्याचा अधिकार फेडरेशनकडे असेल. अजित पवार यांनी विनंती केली आहे की शनिवार व रविवार पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये स्टेज
त्यानंतरचा भाग पवना परिसर
शेवटचा टप्पा सासवड ते बारामती
पोलीस सुरक्षा, वाहतूक, लोकांची व्यवस्था व लॉजिस्टिक्स यावर सर्व संबंधित विभागांशी चर्चा झाली आहे. कुठेही कमीपणा राहू नये, यावर भर देण्यात आला आहे.
या स्पर्धेसाठी वापरले जाणारे रस्ते पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, PWD व PMRDAच्या हद्दीत येतात. चारही विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.
प्रत्येक पंधरा दिवसांनी अधिकाऱ्यांची बैठक होणार असून, प्रत्येक दुसऱ्या बैठकीला अजित पवार स्वतः उपस्थित राहतील. क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, “ही स्पर्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावी, पर्यटनाला चालना मिळावी आणि सायकल वापरासारख्या पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन मिळावे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.”