पुणे जिल्हा परिषद, आंबेगाव पंचायत समितीसह मंचर नगरपंचायत निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेने फुंकले रणशिंग !!

Photo of author

By Sandhya


—————————————————————

शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना व सर्व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांची महत्वपूर्ण बैठक किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे व शिवसेना शिरूर लोकसभा संपर्कप्रमुख विकास रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल माऊली बँक्वेट, पुणे नाशिक महामार्ग, एकलहरे येथे उत्साहात संपन्न झाली.

यावेळी आमदार शरददादा सोनवणे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत असल्याने पुणे जिल्हा परिषद, आंबेगाव पंचायत समितीसह मंचर नगरपंचायत निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे सांगितले. शिवसेना लोकप्रतिनिधींना त्यांच्या गावातील विविध विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गाव तेथे शिवसेना शाखा व घर तिथे शिवसैनिक अभियान प्रभावीपणे राबवत गोर गरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने काम करावे असे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मागील अडीच वर्षात घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमुळे शिवसेनेचा जनाधार राज्यात वाढल्याने विधानसभेत पुन्हा महायुतीची सत्ता आली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी तालुक्यातील सर्व जागांवर उमेदवार तयार असल्याचे बैठकीत स्पष्टपणे सांगितले.

यावेळी युवासनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना युवानेते रमेश येवले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ.संगिताताई वाघ, मंचरचे मा.सरपंच दत्ता गांजाळे, शिवसेना जिल्हा संघटक नित्यानंद येवले, जिल्हा समन्वयक कल्याण हिंगे, युवासेना शिरूर लोकसभा अध्यक्ष वैभव पोखरकर, उपजिल्हा अध्यक्ष विकास जाधव, तालुका अध्यक्ष योगेश थोरात, महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौ.सुरेखाताई निघोट, उपजिल्हा संघटक सौ.ज्योतीताई गाडे, तालुका संघटक जागृती महाजन, सरपंच सौ.प्रिती थोरात पाटील, सौ.संगिता बाणखेले, सरपंच रविंद्र वळसे पाटील, आंबेगाव तालुका संघटक वासुदेव भालेराव, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष विजय केंगले, मंचर शहरप्रमुख संदीप जुन्नरे, उपतालुकाप्रमुख किरण ढोबळे, विकास बांगर, विभागप्रमुख प्रदीप डोके यांचेसह बैठकीला मोठ्या संख्येने तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. प्रकाश बोऱ्हाडे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page