


पुणे – शहरातील नगर रस्त्यावर रामवाडी, गावठाण परिसरात काल मध्यरात्री सुमारास आग लागल्याची घटना घडली. एका व्यावसायिक इमारतीच्या बाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सहा दुचाकी वाहनांना अचानक आग लागली.
ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच दुचाकी जळून खाक झाल्या. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्याने इमारतीतील नागरिकांमध्ये घबराट उडाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने दाखल झाल्या. दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करत इमारतीत अडकलेल्या सुमारे १०० नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रामवाडी पोलीस ठाण्याकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
ठळक बाबी :
घटना मध्यरात्री १ वाजता रामवाडी गावठाण येथेव्यावसायिक इमारती बाहेर पार्क केलेल्या ६ दुचाकींना आग मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट अग्निशमन दलाकडून तातडीची कारवाई, १०० नागरिकांची सुटका कोणतीही जीवितहानी नाही, मात्र दुचाकीचे नुकसान पोलिसांकडून तपास सुरू ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनीही मदतीसाठी पुढे सरसावले. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.