
भर चौकात अपघात होऊन पोलिसांची मिळत नाही मदत ?
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे डंपरने क्र. (एम एच १२ व्ही टी ७५९४ ) याने तळवाडी चौक येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांना चालू मध्येच मागून जोरदार धडक दिली असल्याची घटना (ता. ०५ जुलै) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. दहा टायर डंपर हा ओव्हरलोडींग असल्यामुळे दोन क्रेन आणून बाजूला करावा लागला. हा डंपर खडीने भरलेला होता.
वाहतूक पोलीस चौकात नाही तर मग कुठे ? वाहन चालकांचा सवाल..
या अपघातात ट्रक, छोटा हत्ती टेम्पो, व कारचा समावेश आहे. यात छोटा हत्ती टेम्पो मधील तीन जणांना डोक्याला दुखापत झाली असून कार गाडीतील चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
” डंपर चालक मद्यपी करून वाहन चालवत असल्याचा नागरिकांची चर्चा “
याच तळवाडी चौकात काही महिन्यापूर्वी एका डंपरच्या टायर खाली महिलेचा मृत्यू झाला होता. त्या चौकात ही दुसरी घटना घडली आहे. हा चौक उरुळी कांचन येथील महत्त्वाचा असून अपघात होऊन १५ ते २० मिनिटे होऊन पोलीसांची मदत मिळु शकली नाही अशी खंत वाहन चालकांनी व्यक्त केली. बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी किरण भंडारी आणि त्यांचे मित्रपरिवार व स्थानिक नागरिकांनी वाहने बाजूला काढून नागरिकांना अपघात वाहनातून बाहेर काढले . सतत गजबजलेला तळवाडी चौकात डंपर कडून ही दुसरी घटना घडली आहे. सुदैवाने समोर असलेल्या वाहनांमुळे मोठी घटना टळली.
प्रतिनिधी, नितीन करडे