पुणे सोलापूर महामार्गावर पहाटेचा थरार! दोन चारचाकी एक दुचाकीला ठोकर देऊन टँकर शिरला दुकानात

Photo of author

By Sandhya

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील पोलीस स्टेशन शेजारी रविवार (ता. ५ ऑक्टोंबर) रोजी पहाटे चार वाहणांचा भीषण अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. टँकर (क्र. एम एच ४३-सी के ८९०३) १६ टायर असून सोयाबीन तेलाने ३५ टन भरलेला होता. महामार्गावरून सोलापूरच्या दिशेला जात असताना उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरील नवीन बनवण्यात आलेल्या डिव्हायडर येथे अचानक थांबलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर चालकाचे नियंत्रण सुटले व टँकर अमर टायर दुकानासमोरील दोन चारचाकी व एक दुचाकीला ठोकर देऊन थेट दुकानात शिरला. असे टँकर चालक लक्ष्मण वर्मा वय ३१वर्ष रा. बलरामपुर,जि. गोंडा युपी, यांनी सांगितले.

यात टँकर चालक जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अशिष उल्लाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने चालकाला टँकर मधून बाहेर काढले व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात वाहनांसह दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे.
टायरच्या दुकानात नवीन इलेक्ट्रॉनिक, अलाइनमेंट, बॅलन्सिंग मशनी होत्या यात मशीनचा चक्काचूर झाला असून तीस ते पस्तीस लाखाचे नुकसान झाले आहे. अपघात ठिकाणी दिवसा वरदळ असती. आमचे नवीन दुकान केले होते त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

सोयाबीन तेलानी ३५ टन भरलेला टँकरला समोर अचानक आलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकरचे नियंत्रण सुटून उभे असलेल्या तीन वाहणांना ठोकर देऊन टँकर शिरला दुकानात, टँकर दुकानात घुसल्याने मोठा आवाज आणि धूर

Leave a Comment

You cannot copy content of this page