


कोथरूड मधील एका महिलेची दोन लाख 60 हजार रुपयाची फसवणूक झाल्याची घटना उघड, हकीकत अशी की देखने वाला खान बाबा याच्याकडे सदर महिला आपल्या मुलाची नोकरी गेलेली आहे व मी सध्या आर्थिक विवंचनेत अडकलेली आहे अशी समस्या घेऊन ही महिला देखने वाला खान बाबा याच्याकडे केली असता याबाबाने तुम्ही जिथे काम करता तिथे धन आहे तिथली माती आणून दिल्यास मी त्या मातीचे सोने करून तुम्हाला धनवान बनवेल अशी खोटी आशा दाखवून त्या महिलेकडून विविध म्हणजेच बकऱ्याचे बळी, म्हशीचे बळी, कोंबड्यांचे बळी आणि विविध पूजा आर्चेसाठी दोन लाख 60 हजार रुपयाची मागणी केली आपल्याला गुप्त जाणं मिळेल या आशेने सदर महिलेने बाबाला टप्प्याटप्प्याने पैसे दिले, एके दिवशी बाबा ने एका मडक्यामध्ये माती भरून त्या महिलेस दिली व सातारा दिवस विधिवत पूजा केल्यास मडक्यातून तुला सोने प्राप्त होईल असे सांगितले, बाबांनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने त्या महिलेने सतरा दिवसानंतर ते मडके उघडून पाहिल्यानंतर त्यात चक्क माती निघाली आपली फसवणूक झाली असे आढळून आल्यानंतर त्या महिलेने त्या बाबाकडे तगादा लावला बाबा तुम्ही आमची फसवणूक केली असे सांगितल्यानंतर बाबांनी पुन्हा त्यांना उपाय करून देतो आणि त्यासाठी पैसे लागतील असे सांगितले. त्यानंतर त्या महिलेने आपली अशीच फसवणूक होणार आणि ह्या अगोदर कित्येक महिलांची फसवणूक झाली असेल असे त्याच्या मनात आले आणि त्याने थेट कोरेगाव पोलीस स्टेशन ठाणे गाठले आणि आपल्या सोबत झालेली हकीगत कोरेगाव पार्क चे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील थोपटे. तसेच पुणे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांच्यासमोर ही हकीगत मांडल्यानंतर वेळेचाही विलंब न करता या पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचून देखने वाला खान बाबा यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईत समक्ष पोलीस वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वनवे, पोलीस हवालदार भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू सोसायटीत असे प्रकार घडत आहेत यास वेळीच आळा बसला पाहिजे असे सर्वसामान्याचे म्हणणे आहे. देखने वाला खान बाबा यास अटक होऊन आणखी काही महिलांची फसवणूक झालेली आहे का हा तपास स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे हे करत आहे