बीआरटीतील बसशेडच बनले रोडरोमीओचा अड्डा

Photo of author

By Sandhya

बिकट अवस्था बीआरटीच्या बसशेडची,
बसशेड बनले गुटख्याचे आगार
कोट्यवधी रुपयांचा खर्च गेला पाण्यात

पालिका पीएमटी विभागाच्या वतीने प्रवासासाठी बीआरटी मार्गावर बनविण्यात आलेले बसशेड हे अनेक समस्यांच्या विळख्यात अडकून धूळखात पडून असल्याने सध्या ते रोड रोमीओचे अड्डे बनल्याने यासाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जाऊन या मार्गावर प्रवास करणाऱ्या महिला वर्गांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या शहरासह उपनगर भागात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वाहनांच्या संख्येत ही दिवसेदिवस वाढ होत असल्यामुळे आज संपूर्ण शहरालाच नव्हे तर उपनगर भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळत असताना या कोंडीत अडकलेल्या शहराची सुटका कधी होणार हा मुख्य प्रश्न अनेकांना भेडसावत असताना नेहमीच होणाऱ्या या त्रासामुळे पुणेकर हैराण झाले असतानाच याचा त्रास फक्त वैयक्तिक जाणाऱ्या वाहन चालकांनाच नाही तर बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील याची किंमत मोजावी लागत असताना यातून प्रवाशी वर्गाची सुटका होण्याच्या उद्देशाने पालिका व पीएमटी विभागाच्या वतीने अंदाजे दहा ते पंधरा वर्षापूर्वी सातारा, सोलापूर, अहिल्यानगर व श्री क्षेत्र आळंदी मार्गावर प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून स्वतंत्र बसेस जाण्यासाठी बीआरटी हा प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्च करून राबविण्यात आला आहे.
मात्र या प्रकल्पासाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याचे सध्या म्हणण्याची वेळ आली आहे.सोलापूर व सातारा महामार्गावरील प्रकल्प जरी सुरू असले तरी पण नगर रोडवरील रस्ता रुंदीकरणाच्या नादात या प्रकल्पावर बुलडोझर फिरविण्यात येऊन हा बी आरटी मार्ग संपुष्टात आला आहे. आळंदी मार्गावर हा प्रकल्प जरी सुरू असला तरी पण या मार्गावरील बसशेडची झालेली दुरवस्था अतिशय बिकट आहे. या मार्गावर आंबेडकर सोसायटी, फुलेनगर, मेंटल कॉर्नर अशा ठिकाणी प्रवाशांना बसचा लाभ मिळावा याकरिता बसशेड उभारण्यात आल्याने शहरात कामानिमित्त जाणाऱ्या महिला वर्ग या मनात धास्ती घेऊनच या ठिकाणी बसेसची वाट पाहत उभे असतात.अनेक बसशेडचा ताबा हा रोडरोमीओनी घेतला असून सकाळच्या सुमारास अनेक महिला वर्ग व कॉलेज युवती बसेसची वाट पाहत उभ्या असतात. मात्र अनेकदा टवाळकी व गुंडप्रवृत्तीचे युवक हे थेट दुचाकी वाहने बसशेडमध्येच आणून टवाळकी करत असल्याचे दिसून येते. या विरोधात एखाद्या महिला वर्गाने आवाज उठविण्याचा प्रयत्न करण्यास गेल्यावर अशा टवाळखोरांच्या दहशतीचा सामना युवतींना करण्याची वेळ येत असल्याने याविरोधात आवाज उठवण्यास महिलांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यातच एकीकडे दिवसाला लाखो रुपये कमविणाऱ्या पीएमटी खात्याकडून अद्याप ही सुरक्षा रक्षक नेमण्यात न आल्याने महिला प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त करून बदलापूर व स्वारगेट सारख्या शहरातील रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी व युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होण्याची हा विभाग वाट पाहतोय का? असा संतप्त सवाल महिलांकडून केला जात आहे. त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
त्यातच रात्रीच्या सुमारास अशा बसशेड मध्ये काही अनुचित घटना होऊ नये. याकरिता विजमिटर बसून विद्युत दिव्यांची सोय करण्यात आली आहे. मात्र सध्या बसविण्यात आलेले वीजमीटर गायब असून केबल देखील तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे रात्रीचा बस ने प्रवास करणाऱ्या महिला वर्गांना नाईलाजास्तव अंधारमय वातावरणात बसची वाट पाहण्याची वेळ येत आहे. उभारण्यात आलेल्या बसशेडची परिस्थिती पाहिली तर येथील खिडक्यांना बसविण्यात आलेल्या काचा देखील फुटलेल्या अवस्थेत असल्याने पावसाळ्याच्या सुमारास नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. तर येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसमध्ये चढ अथवा उतरण्यासाठी इलेक्ट्रिक दरवाजे बसविण्यात आले आहेत. पण त्यांची सध्याची स्थिती पाहिली तर हे खरोखरच बीआरटी मधील बसशेड आहे का? असा मुख्य प्रश्न अनेक प्रवाशांना पडत असतानाच असलेली बसशेडमध्ये अनेकजण गुटखा अथवा तंबाखूच्या पिचकाऱ्या या ठिकाणीच मारत आहेत. त्यामुळे ते गुटख्याचे आगारच बनले आहे. विशेष म्हणजे अनेक बसशेडच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकांना तोंडावर रुमाल बांधूनच येथून जाण्याची वेळ येऊन प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे दुरवस्था झालेल्या अशा शेडची दुरुस्ती होण्याच्या उद्देशाने अनेक संघटना व पक्षाच्या वतीने आंदोलने करून देखील याबाबत अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न झाल्याने केलेली आंदोलनांना अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवले असल्याचे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या बसशेडची दुरुस्ती व्हावी अन्यथा ते हटविण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे. रोज अनेक कामगार वर्ग,शालेय विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक हे बसने प्रवास करत असतात. प्रवाशी वर्गाकडून पीएमटी विभागास रोजचे लाखोंचे उत्पन्न मिळत असताना देखील नागरिकांच्या समस्येकडे अधिकारी जर पाठ फिरवत असतील तर यासारखी लाजिरवाणी बाब दुसरी नाही.
बीआरटी मधील बसशेडची परिस्थिती पाहून पीएमटी विभागाचे अधिकारी खरोखरच प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरले असून भविष्यात अशा ठिकाणी काही अनुचित घटना घडली तर यास पीएमटी प्रशासन जबाबदार

Leave a Comment

You cannot copy content of this page