
वेश्याव्यवसायात गुंतलेल्या बांगलादेशी महिलांवर पोलिसांचा धडाका | पुणे पोलिसांची गुप्त माहितीवरुन यशस्वी कारवाई
पुणे-पुण्यातील बुधवार पेठ येथील रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलीस स्टेशनच्या पथकाने एक धडक कारवाई करत अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. याबाबत तपासात महिलांनी पुण्यात येऊन स्वतःहून वेश्याव्यवसायात सहभागी झाल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अवैधरीत्या भारतात आलेल्या विदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.
गुप्त माहितीवरून कारवाईचा धडाका
फरासखाना पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री प्रशांत भस्मे यांना बुधवार पेठ परिसरातील आशा बिल्डिंग, ढमढेरे गल्ली येथे अवैधरित्या बांगलादेशी महिला वास्तव्यास आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानंतर ए.टी.सी. (Anti-Trafficking Cell) पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे दोन पथक तयार करून दिनांक २ जुलै रोजी छापा टाकण्यात आला.
या छाप्यात एकूण ८ महिला ताब्यात घेण्यात आल्या. चौकशीत त्यांनी बांगलादेशातून चोरमार्गे भारतात प्रवेश केल्याचे व पुढे पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचा बनाव करत पुण्यात वेश्याव्यवसायात सहभागी झाल्याचे उघड झाले.
ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी महिलांची नावे:
- अंजुरा बेगम (४०), जिल्हा जोशोर
- खदीजा बेगम (२७), जिल्हा जोशोर
- पारोल बेगम (३८), जिल्हा खुलना
- तंजीला बेगम (४०), जिल्हा खुलना
- रुपाली बेगम (३८), जिल्हा खुलना
- मन्सुरा रफिक (१९), राज्य ढाका
- सीमा शेख (४५), जिल्हा खुलना
- रीना खातून (३२), जिल्हा नरैल
पुणे पोलिसांचा संपूर्ण तपास पथक पुढीलप्रमाणे:
या कारवाईसाठी मार्गदर्शन करणारे अधिकारी:
मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार
सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा
अपर पोलीस आयुक्त श्री राजेश बनसोडे
पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ श्री कृषिकेश रावले
सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने
अंमलबजावणीत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी:
पो.नि. प्रशांत भस्मे, पो.नि. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, शितल जाधव, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पुनम पाटील, सपोफौ मोकाशी, तेलंगे, नांगरे, पासलकर, पुकाळे, करदास, कांबळे, सोनुने, जाधव, पवार, खुट्टे, पालांडे, शेख, जुंबड, भालेराव, राऊत, चोरघडे, ढवळे, महाडिक, ओव्हाळ व अन्य पोलीस कर्मचारी.
देशाच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाईचे संकेत
या महिलांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी शहरात अशा स्वरूपाचा अनधिकृत विदेशी नागरिकांचा तपास सुरूच ठेवला असून, अन्य रेड लाईट भागांमध्येही लवकरच छापे पडणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.