
फुले व भंडाराची उधळण,औक्षण करून वाजत गाजत रोशन लोळे यांचे स्वागत करण्यात आले.
जेजुरी येथील रोशन लोळे यांचे वडील बाळासाहेब लोळे यांनी भारतीय सेना दलात नोकरी केली. त्यांचा वारसा घेवून रोशन लोळे हे 2008 साली भारतीय सैन्य दलात रुजू झाले. जम्मू काश्मीर,राजस्थान,गुजरात सीमा रेसेवर देश सेवा केल्या नंतर सेवा निवृत्त होवून ते आज घरी आले . यावेळी लोळे परिवार तसेच नातेवाईकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
महिलांनी औक्षण,तसेच सत्कार,फुलांची व भंडारा ची उधळण,वाजत गाजत करत त्यांचे स्वागत करण्यात आले.
रोशन लोळे यांचे धाकटे बंधू सुशांत लोळे हे देखील बॉम्बे इंजिनिअरिंग बटालियन मध्ये 13 वर्षापासून देशसेवे मध्ये रुजू आहेत.
वडील आणि आपण देश सेवेतून निवृत्त झालो असलो तरी लहान भाऊ देश सेवेत कार्यरत आहे. आम्हा तिघांना देश सेवेची संधी मिळाली हे आमचे भाग्य असल्याचे रोशन लोळे यांनी सांगितले