
पाण्याची चोरी करणाऱ्या प्लंबरवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल
पाणी म्हणजे माणसाचे जीवन आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने अनेक स्वराज्य संस्थांमध्ये पाणी वाचवा मोहीम भविष्यातील पाण्याची चिंता भेडसावू नये म्हणून कायम करण्यात येते. पाण्याची कमतरता किंवा पाण्याचं दुर्भिक्ष म्हणजे मानवी जीवन ठप्प होण्याची लक्षणे ठरतात. आजही अनेक खेडोपाडी पिण्याच्या पाण्याची सोपी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याकारणाने तेथील जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे.
पाणी हे कृत्रिमरित्या बनवता येत नाही आणि पावसाळ्यामध्ये गाव व शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी त्या क्षमतेने भरले नाही तर पाणी कपातीचे संकटाला सामोरे जावं लागतं. अशा परिस्थितीत अशा विविध शहरांमध्ये पाणी चोरीचे प्रमाण वाढले तर मात्र त्या त्या शहरांमध्ये पाण्याचे संकट उभे राहायला आणि पाण्याचे बिल स्थानिक स्वराज्य संस्थांवर भरण्याची नाहक नामुष्कीही येते. आर्थिक उत्पन्नातही घट वाढते. उत्पन्नात घट झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास कामेही रखडतात.
त्यामुळे पाणी चोरी करणे हे कायद्याने प्रतिबंधित केले असून कायद्याने गुन्हा आहे. अशा पाणी चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. अशाच प्रकारची परिस्थिती सध्या भिवंडी महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून उद्भवलेली असून, महापालिकेला पाण्याचे व उत्पन्न स्त्रोताच्या संकटाला सामोरे न जाण्याकरता, तशा पद्धतीची काळजी घेत महापालिका प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर (भा.प्र.से.) यांनी पाणीपुरवठा विभागातील अभियंता यांना सदर पाणी चोरांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याप्रमाणे भिवंडी महापालिका क्षेत्रात खालील प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. भिवंडीतील दिवसेंदिवस होणारी पाणी चोरी ही महापालिकेस डोकेदुखी ठरत आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी चोरी संदर्भात खालील विविध ठिकाणच्या घटनांचे गुन्हे संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेले आहेत.
१) प्रभाग समिती ४ मधील,
मौजे-भिवंडी, धोबी तलाव स्टेडिअमचा मागे, क्रांति सायझिंगचा समोर, रोशन बाग, भिवंडी येथे ७पाहणी केली असता त्याठिकाणी श्री. आसिफ शेख यांनी मनपाची कोणतीही पूर्व परवागनी न घेता अनधिकृतपणे महानगरपालिकेचा रस्ता खोदून इमारतीकरिता ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम केले असल्याने महानगरपालिकेच्या रस्त्याचे नुकसान रु.१४,०००/- प्रती मिटर प्रमाणे (रु.१४,०००, मिटर) = रु.९८,००० असे एकूण रु. ९८,०००/- (अक्षरी रु. आठ्यानणय हजार रु. मात्र) नुकसान झाल्याने त्यांचा विरुद्ध भोईवाडा पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३२४(४) (५), ३२६(ब) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२) मौजे-भिवंडी, केसर बाग, ठाणा रोड, भिवंडी येथे पाहणी केली असता त्याठिकाणी प्लंबर श्री. नसीम अख्तर अंसारी (उर्फ चुन्नू) व प्लंबर श्री. मुमताज अंसारी (उर्फ बबीया) यांनी मनपाची कोणतीही पूर्व परवागनी न घेता महानगरपालिकेच्या नालवाहिनीला छिद्र पाडून अर्धा इंच व्यासाची ७ नळ अनाधिकृत जोडणी घेतलेली असल्यामुळे महानगरपालिकेच्या पाण्याची चोरी अर्धा इंच प्रती व्यापारी कनेक्शन रु.१२,०००/- प्रमाणे (रु.१२०००० ७ कने,)= रु.८४,००० असे एकूण रु. ८४,०००/- (अक्षरी रु. छप्पन्न हजार रु. मात्र) नुकसान झाल्याने त्यांचा विरुद्ध भोईवाडा पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३२४ (४), ३२६ (अ),३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३) मौजे-भिवंडी, चार चाळी, दर्गा रोड, भिवंडी येथे पाहणी केली असता त्याठिकाणी श्री. समीर मोहम्मद यूसुफ मोमीन (समीर प्लंबर) यांनी मनपाची कोणतीही पूर्व परवागनी न घेता महानगरपालिकेच्या जालवाहिनीला छिद्र पाडून तळ अधिक सहा मजली इमारतीकरिता अर्धा इंच व्यासाची ५ नळ अनाधिकृत जोडणी घेतलेली असल्यामुळे महानगरपालिकेच्या पाण्याची चोरी अधां इंच प्रती व्यापारी कनेक्शन रु.१२,०००/- प्रमाणे (रु.१२०००० ५. कने.) रु.६०,००० असे एकूण रु. ६०,०००/- (अक्षरी रु. साठ हजार रु. मात्र) नुकसान झाल्याने त्यांचा विरुद्ध भोईवाडा पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३२४(४), ३२६ (अ), ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई प्रशासक तथा आयुक्त सागर यांचे आदेशान्वये कार्यकारी अभियंता संदीप पटणावर, पाणी पुरवठा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सरफराज अंसारी यांचे अधिपत्याखाली विराज भोईर, पथक प्रमुख, नफीस मोमीन, सहाय्यक पथक प्रमुख यांचे मार्फत करण्यात आली.