
यवत – यवत पोलीस स्टेशन च्या हद्दीतील भुलेश्वर पायथ्याशी सापडलेल्या अनोळखी इसमाच्या खून प्रकरणात यवत पोलिसांना मोठे यश मिळाले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहेत .
याबाबत सविस्तर माहिती अशी कि ,दि. २७ जुन २०२५ रोजी भुलेश्वर पायथा परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर ,छातीवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या मृतदेहावर ज्वलनशील पदार्थाच्या माध्यमातून त्याला पेटून दिले होते .
याबाबत पोलीस हवालदार विनायक हाके यांनी यवत पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता . या वेळी तपास करताना तांत्रिक विश्लेषण व मिसिंग रिपोर्टयांच्या माध्यमातून सखोल तपास केल्यानंतर , धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पोलिस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या लखन किसनराव सलगर (वय २४, रा. टाकली ढोकी ,जि धाराशिव ) हा मृत इसम असल्याचे निष्पन्न झाले
.त्यानंतर सखोल तपास केल्यानंतर पाच आरोपींना अटक करण्यात आले असून यामध्ये १. योगेश दादा पडळकर (वय २५) २. राजश्री योगेश पडळकर (वय २३, दोघेही रा . माळशिरस , ता- पुरंदर जि .पुणे ) ३. विकास आश्रुबा कोरडे (वय २१ रा. आनंदवाडी ,टाकली ढोकी , जि धाराशिव ) ४ . शुभम उमेश वाघमोडे (वय २२ रा. मुरुड जि लातूर ) ५. लालासाहेब कालिदास मोटे (वय ४२ रा. येवती जि धाराशिव ) यांनी संगम मताने कट रचून इसम नाव लखन किसनराव सलगर यास तीव्र धारदार अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावरती उजव्या छातीवर, पाठीवर वर करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकून जीवे ठार मारले असल्याचे कबुल केले आहे .
सदर गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण व यवत पोलिसांनी दि . ११-७-२०२५ रोजी ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा .पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल ,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ,उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस ,यवत पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश माने करत आहेत .