मंचर येथील खून झालेल्या टपरी चालकाच्या आरोपींना मंचर पोलिसांनी केले तीन तासात अटक

Photo of author

By Sandhya

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे महात्मा गांधी विद्यालयाजवळ टपरी चालवणारे दिव्यांग तरुण गणेश रवींद्र सोनवणे (वय 28 रा.शीतकलवस्ती मंचर याचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना काल मंगळवार दिनांक 29 रोजी घडली. मंचर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीवर खुणाचा गुन्हा दाखल केला होता .
टपरी जागा मालक लक्ष्मण किसनराव शेटे यांनी मंचर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली की, गणेश सोनवणे याचा मृतदेह टपरीजवळ असलेल्या गाडीमध्ये पुढील सीटवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. त्याच्या मानेजवळ,पोटाजवळ आणि हातावर कशानेतरी वार केले होते. नेमका खून कोणत्या कारणावरून झाला आणि आरोपी कोण होतं याचा मात्र तपास लागला नाही. मंचर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर अवघ्या तीन तासातच आरोपी सिद्धेश संतोष रेनके (वय वर्ष 19,रा. इंदिरानगर, मंचर), विघ्नेश अशोक शेवाळे (वय वर्ष 20,रा. लांडेवाडी, ता. आंबेगाव ) अशा दोन आरोपींना ताब्यात घेतले.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत गणेश सोनवणे आणि आरोपी सिद्धेश रेनके, विघ्नेश शेवाळे हे रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान मयत गणेश सोनवणे यांच्या टपरीजवळ असलेल्या गाडीमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. तिघांनी दारू पिल्यानंतर त्यांना दारूची नशा चढली. त्यामध्ये मयत गणेश सोनवणे याने सिद्धेश रेनके याला त्याच्या आईवरून अश्लील शिवी दिली. सिद्धेश रेनके याला आईवरून शिवी दिली या कारणावरून राग अनावर झाला. त्यातूनच त्याने त्याच्या शेजारी असलेली दारूची बाटली फोडली. आणि त्याचा वापर हत्यार म्हणून करत गणेश सोनवणे यांच्या मानेवर, पोटावर खुपसली. त्यामध्ये गणेश सोनवणे याचा मृत्यू झाला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे हे करत आहेत.

Leave a Comment