





लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती (मंचर) परिसरात जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात विभागाच्या अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शासकीय कार्यालयात “पैसे घ्या पण माझे काम करा” असे सांगणारे तसेच लाच स्वीकारणारे – दोघेही कायद्यानुसार दोषी ठरतात, याची जाणीव नागरिकांना करून देण्यात आली. लाचेची मागणी झाल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती देण्याचे आवाहन विभागाच्या अधिकारी ए. पी. आय. शैलजा शिंदे मॅडम यांनी नागरिकांना केले.
यानंतर प्रांत कार्यालय मंचर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंचर, मंचर नगरपरिषद, तसेच महावितरण कार्यालय येथे भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. विविध ठिकाणी पोस्टर आणि स्टीकर्स लावून जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये —
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंचरचे अधिकारी श्री. विठ्ठल सुर्यवंशी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे सहकोषाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर उंडे, जिल्हा सचिव श्री. अशोक भोर, तालुका अध्यक्ष श्री. देवीदास काळे, मार्केट कमिटी सचिव श्री. सचिन बोराडे, तालुका उपाध्यक्ष श्री. संजय चिंचपुरे, तालुका सचिव श्री. दिनेश भालेराव, तसेच पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीमती आशा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल सुर्यवंशी, माऊली उंडे व आशोक भोर यांनी आपले मनोगत व्यक्त करून अशा जनजागृती उपक्रमांमुळे प्रशासनावरील विश्वास दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले.