





२९ जून रोजी मुक्तागिरी बंगला, मलबार हिल, मुंबई येथे झाला ऐतिहासिक प्रवेश !!
————————————————————————-
शिवसेना मुख्यनेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते आणि किल्ले शिवनेरी जुन्नरचे कार्यसम्राट आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख मा.शरददादा सोनवणे, शिवसेना सचिव मा.रामभाऊ रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर नगरीचे कार्यसम्राट सरपंच आणि उबाठा गटाचे आंबेगाव तालुकाप्रमुख श्री.दत्ताभाऊ गांजाळे यांनी विविध राजकीय पक्षांतील लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा रविवार, दिनांक २९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, मुंबईतील मलबार हिल येथील मुक्तागिरी बंगल्यावर उत्साहात पार पडला.
मंचर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांसाठी ना.शिंदे साहेबांनी यापूर्वी आपल्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी उपलब्घ करून दिल्याने त्यांचा मंचरकरांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी मंचर शहर आणि आंबेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगून आगामी काळात होणाऱ्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवण्यासाठी कामाला लावावे असे सांगून लवकरच आंबेगाव आणि मंचरकरांच्या भेटीसाठी येणार असल्याचे सांगितले.
यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना महिला आघाडी उपनेत्या सौ.सुलभाताई उबाळे, शिवसेना जिल्हा परिषद मा.गटनेते श्री.देविदास दरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव पोखरकर, महिला आघाडीच्या सौ.सुरेखाताई निघोट, सरपंच रविंद्र वळसे पाटील, श्रीकांत लोखंडे, कल्याणराव हिंगे, वासुदेव भालेराव, प्रविण कोकणे, किरण ढोबळे, शहरप्रमुख संदिप जुन्नरे, माऊली लोखंडे आंबेगाव तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.दत्ताभाऊ गांजाळे यांच्या समवेत मंचर शहरातील मा.सरपंच कैलासराव गांजाळे, ग्रामपंचायत सदस्य सौ.जागृतीताई महाजन, सौ.संगिताताई बाणखेले, सौ.सुप्रियाताई राजगुरव, सौ.ज्योतीताई बाणखेले, बाजार समितीचे मा.संचालक अरुणनाना बाणखेले, विलासराव गांजाळे, शिवसेना उबाठा गटाचे मंचर शहरप्रमुख विकास जाधव, सौ.सुवर्णाताई डोंगरे यांच्यासह विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. दत्ताभाऊ गांजाळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे आंबेगाव तालुक्यातील शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून उद्याच्या काळात होणाऱ्या मंचर नगरपंचायत, जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आधी तालुक्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसून येतील आणि सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल असा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.