महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यामध्ये गोंधळ

Photo of author

By Sandhya

राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल मनसे कार्यकर्ते आक्रमक

कोथरूड येथील केदार सोमण नावाच्या व्यक्तीच्या घरी मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ

पोलीसानी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य राडा टळला

मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले

कोथरूड येथील राहणारा केदार सोमण याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती

ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी सुमन यांचा पत्ता शोधत आज सकाळी थेट त्यांच्या घरावर धडक दिली. सुमन यांच्या घरी मनसे कार्यकर्ते पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलीस कोथरूड येथील इंद्रधनु सोसायटीमध्ये पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना जास्त सोसायटीच्या मुख्य द्वारापासून बाजूला केलं आणि रस्त्यावर घेऊन गेले आणि त्यानंतर केदार सोमण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र केदार सोमान याला घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर चालून जात मोठा गोंधळ घातला

Leave a Comment

You cannot copy content of this page