महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध

Photo of author

By Sandhya

शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन २०२६ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.in व http://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविली आहे.

प्रस्तावित वेळापत्रकानुसार सन २०२६ मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२५, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-२०२६, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ इत्यादी परीक्षा होणार आहेत, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page