
पुणे गेल्या ८ ते १० दिवसांत मावळ भागात ९ अजगरांचा रेस्क्यू करण्यात आला. पावसामुळे सापांचे वास्तव्य लोकवस्तीमध्ये वाढले असून, घोणस सापांची पिल्लेसुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.वनविभाग वडगाव मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडले. काही अजगर ९-१० फूट लांबीचे तर काही फक्त १.५ फूटाचे पिल्लू होते. रेस्क्यू केलेले सर्व साप सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.अजगर हा बिनविषारी असून संथ हालचाल करतो, तर घोणस (रसेल्स वायपर) अत्यंत विषारी आणि चपळ असतो. जनतेने दोघांमधील फरक समजून घ्यावा आणि कोणताही साप आढळल्यास तात्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी (१९२६) संपर्क साधावा.
साप हे पर्यावरणीय साखळीतील महत्त्वाचे घटक आहेत, आणि जनजागृतीतून त्यांच्याविषयीची भीती कमी करून सहअस्तित्व शक्य आहे.