मोटार वाहने भाडेतत्वावर लावून त्या बदल्यात आर्थिक फायदा करून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करणाऱ्या व अपहार करणाऱ्या आरोपींना काशिमिरा पोलीस ठाणे मीरा भाईंदर ,वसई विरार पोलीस आयुक्तालय यांनी अटक करून त्यांच्याकडून २४६ मोटार वाहने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २५,००,०० ,००० कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली आहेत .

आरोपी संदीप सुरेश कांदळकर उर्फ राजू राजीव जोशी यांनी फिर्यादी भावेश शेखर अंबवणे रा .महाजनवाडी ,मीरारोड पूर्व जि .ठाणे व साक्षीदार यांच्या नावे नवीन गाड्या शोरूममध्ये बुक करून त्या गाड्या एअरपोर्ट व जेएनपिटी बंदर येथे भाड्याने लावून प्रत्येक गाडीचे ५५,००० ते ७५,००० हजार रुपये भाडे मिळेल व भाड्याच्या रकमेतून कर्जाचा हप्ता वगळता उर्वरित रक्कम प्रत्येक गाडीमागे देतो अशी स्कीम सांगून बुकिंगसाठी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लेखी करारनामा करून रोख रक्कम तसेच बँक खात्यात ऑनलाईन पैसे स्वीकारून सुरुवातीस फिर्यादी भावेश अंबवणे व साक्षीदार यांना गाडीचे भाडे म्हणून रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करून अंबवणे व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून त्यानंतर फिर्यादी अंबवणे व साक्षीदार यांचे गाडीच्या बुकिंगसाठी घेतलेली रक्कम व गाड्यांचा अपहार करून आरोपी संदीप सुरेश कांदळकर उर्फ राजू राजीव जोशी याने फिर्यादी व साक्षीदार यांची आर्थिक फसवणूक केली आहे .त्यामध्ये संदीप सुरेश कांदळकर रा .१४८ ,गणेशवाडी ,गाव नवशी ,ता .दापोली ,जि .रत्नागिरी यास २४ एप्रिल २०२५ रोजी तर त्याचा साथीदार सचिन सुनील तेटगुरे रा दापोली .जि .रत्नागिरी यास दि .२३ एप्रिल २०२५ रोजी अटक केली आहे .तसेच इतर ७ आरोपींचा गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरु आहे .