

नागपूर, दि. 6 : रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना भेटून त्यांचे निवेदन स्वीकारून त्यांची गाऱ्हाणी ऐकली तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात आश्वस्त केले.
रामगिरी येथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यामध्ये महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक नागरिकांला भेटून त्यांची निवेदन स्वीकारली. यावेळी नागरिकांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी तसेच आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे असलेले प्रलंबित प्रश्न, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, अनुकंपा नोकरी आदी प्रश्नाबाबत निवेदन सादर केली. प्रत्येक नागरिकाला त्यांच्या तक्रारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान केले.
राज्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे बाधित शेतकऱ्यांना सहाय्य व्हावे यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांना नागरिकांनी यावेळी धनादेश दिला. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये विविध संस्था व लोकप्रतिनिधींचा समावेश होता.