
जेजुरी – पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा परिषेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थींनीसाठी ‘सायकल बँक ‘हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरापासून २-३ किलोमीटरवर शाळा असेल व घरात सायकल नसेल तर पायी प्रवास करावा लागतो.यामुळे शिक्षणात अडथळा येतो.या अडचणीवर मात करण्यासाठी व मुलींना शाळेपर्यंत जाण्यासाठी “सायकल बँक “उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानुसार गावातील दानशूर व्यक्ती पालक,शिक्षक,तरुणमंडळ,समाजसेवक,उद्योगपती,शासकीय अधिकारी,कर्मचारी,विविध संस्था,संघटना,मंडळ यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत १५ ऑगस्टच्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात सायकल दान कराव्यात व इतर व्यक्तींनी व संस्थांनी १५ ऑगस्ट पर्यंत सायकली दान करण्यासाठी पंकज पाटील 9404421427 यांचेशी संपर्क करावा असे आवाहन पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ व पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांनी केले आहे.
सायकल बँक उपक्रमांतर्गत जमा होणाऱ्या सायकली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलींना वापरता येतील.नंतर ‘सायकल बँके’मध्ये सायकल जमा करुन पुढील वर्षी नव्याने ५ वीत येणाऱ्या मुलींना सदर सायकल उपलब्ध करुन दिली जाईल.त्यामुळे मुलींचा शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर होईल.उपस्थिती वाढेल व मुलींचे शिक्षण टिकेल :- गजानन पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, पुणे