




यवत – यवत जवळ पुणे -सोलापूर महामार्गावर दोन कार चा भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा दुर्दैवी
मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि ,
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणार्या लाल रंगाच्या स्विफ्ट गाडी (एम. एच.12 व्ही 5052)ने पुणे-सोलापूर महामार्गावरील दुभाजक ओलांडून दुसर्या लेन वरुण जाणार्या स्विफ्ट डिझायर ( एम. एच. 12 टी वाय7531)गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत स्विफ्ट डिझायर गाडीतील अशोक विश्वनाथराव थोरबोले ( वय 57,रा .उरुळीकांचन, ता. हवेली जि. पुणे) तसेच स्विफ्ट मधील गणेश धनंजय दोरगे (वय 28,रा. यवत ता-दौंड, जि-पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात पाच जण जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामध्ये अजून एक कार गाडी( एम. एच. 12 एनयू 5501)या गाडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान असून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य केले
या प्रकरणी ज्ञानेश्वर विश्वनाथराव थोरबोले यांच्या फिर्यादीवरून राकेश मारूती भोसले( रा. बोरीभडक ता. दौंड जि- पुणे ) याच्यावर BNS 106(1), 281, 125(अ), 125(ब) 324 (4) (5)मोटार वाहन कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.